कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात आजही कोरोनाचा उच्चांक; सलग दुसऱ्या दिवशी आकडा लाखाच्या जवळ

नवी दिल्ली : देशात कोरोनाने अक्षरशा कहर मांडलेला दिसून येत आहे. आजही जगातील एका दिवसाच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद आज भारतात झाली आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने भारतात ८० हजारांपेक्षा जास्त नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. अशात आज कालचा देशातील ९५ हजार ५२९चा उच्चांक मोडत नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आज भारतात एकूण ११ वाजून २९ मिनीटापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार ९६ हजार ७६० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारतात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही आता ४५ लाख ५९ हजार ७२५ एवढी झाली आहे. यापूर्वी कधीही भारतासोबत जगातील अन्य कुठल्याही देशात एवढे रुग्ण सापडले नव्हते. काल ९५ हजारांचा आकडा ओलांडल्यानंतर आज भारताने ९६ हजार रुग्णांचा आकडाही ओलांडला आहे. मागील २४ तासात भारतात एकूण ११९७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण मृत्यूंचा आकडा आता ७६हजार २८८वर पोहोचला आहे. देशात आज ६८ हजार १३० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत देशात कोरोनावर मात केलेल्यांची संख्या ३५ लाख ३७ हजार २१४ एवढी झाली आहे. सध्या भारतात एकूण उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ही ०९ लाख ४५ हजार ५८१ झाली आहे.

भारतात आतापर्यंत जवळपास ५.३ कोटी कोरोना चाचण्या झाल्या आहेत. भारतातील पॉजिटिव्हिटी रेट हा ८.६ टक्के असा आहे. तर, रिकव्हरी रेट हा ७७.६ टक्के एवढा आहे. भारतातील कोरोनाबाधितांची संख्या ही दिवसागणिक वाढतच चालली असून मागील दोन दिवसांपासून ९५ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

महाराष्ट्रातील एकूण रुग्णसंख्या १० लाखांच्या घरात
महाराष्ट्रातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता १० लाखांच्या घरात गेली आहे. ९ लाख ९० हजार ७९५ राज्यात इतके रुग्ण झाले आहेत. मागील २४ तासांत २३ हजार ४४६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद ४४८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच, १४ हजार २५३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत ७ लाख ७१५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात २ लाख ६१ हजार ४३२ अॅक्टिव्ह केसेस आहेत.

राज्यात ४९ लाख ७४ हजार ५५८ कोरोना चाचण्या झाल्या आहेत. सध्या राज्यात १६ लाख ३० हजार ७०१ व्यक्ती होम क्वारंटाइन आहे तर ३८ हजार २२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ७०.७२ टक्के इतके झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत