दिल्ली हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलकांचा मोठा निर्णय
देश बातमी

दिल्ली हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलकांचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकरी आंदोलकांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर भारतीय किसान युनियन आणि राष्ट्रीय किसान मजदूर संघानं आपलं आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही संघटनांचे नेते व्ही. एम. सिंग आणि ठाकूर भानूप्रताप सिंह यांनी बुधवारी याची घोषणा केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारतीय किसान युनियनचे नेते ठाकूर भानूप्रताप सिंह चिल्ला यांनी बॉर्डर येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना चिल्ला म्हणाले की, “दिल्लीत काल जे काही घडलं यानं मला खूपच दुःख झालं. त्यामुळे आम्ही ५८व्या दिवशी आमचं आंदोलन थांबवत आहोत. किसान युनियनच्या या गटाला संयुक्त किसान मोर्चाने यापूर्वीच आंदोलनापासून वेगळं केलं होतं. कारण सुरुवातीला सरकारच्या मंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी आंदोलन संपवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, सर्व शेतकऱ्यांच्या भावना पाहता त्यांनी आंदोलन सुरुच ठेवलं होतं.

“ज्यांनी लोकांना भडकावलं त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. भारताचा झेंडा, देशाची स्वाभिमान, मर्यादा सर्वांसाठी आहे. ही मर्यादा ओलांडणारे आणि त्यांना ती ओलांडू देणारे सर्व चुकीचे आहेत. टिकैत यांच्यावर आरोप करता ते वेगळ्या मार्गाने जाऊ पाहत होते, असे स्पष्टीकरण व्ही. एम. सिंह यांनी दिले आहे.

त्याचबरोबर, राष्ट्रीय किसान मजदूर संघटन या आंदोलनातून आणि ऑल इंडिया किसान संघर्ष कोऑर्डिनेशन कमिटीतून माघार घेत आहे. मात्र “ज्यांचा हिंसाचाराचा मार्ग आहे त्यांच्यासोबत आम्ही आमचं आंदोलन पुढे नेऊ शकत नाही. आंदोलन चालू ठेवण्यासाठी आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत.” अशी भूमिका राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे व्ही. एम. सिंह यांनी मांडली.