महाराष्ट्र हादरला! भानामतीच्या संशयातून दलित कुटुंबातील सात जणांसोबत अमानुष कृत्य
बातमी विदर्भ

महाराष्ट्र हादरला! भानामतीच्या संशयातून दलित कुटुंबातील सात जणांसोबत अमानुष कृत्य

चंद्रपूर : महाराष्ट्राला हादरवून सोडणारी एक घटना चंद्रपुरात घडली आहे. जादूटोणा आणि भानामती केल्याच्या संशयातून एका कुटुंबाला मारहाण करण्यात आली आहे. गावकऱ्यांनी कुटुंबातील सात सदस्यांना झाडाला बांधून मारहाण केली. कुटुंबीयांना भरचौकात नेऊन त्यांचे हातपाय बांधून मारहाण करण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवतीपासून 12 किमी अंतरावर असणाऱ्या अति दुर्गम भागातील वणी खुर्द गावात घडली आहे. मारहाणीत गंभीर झालेल्या कुटुंबीयांपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वणी खुर्द गावात हा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार घडला आहे. अद्याप पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई केलेली नाही.

माणुसकीला कलंकित करणारी ही घटना शनिवारी उघडकीस आली आहे. पण घटना घडून चोवीस तास उलटल्यानंतर यावर पोलिसांनी ठोस कारवाई केल्याचं दिसत नाही. याउलट या घटनेत पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी काही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पण किती लोकांवर गुन्हा दाखल केला? किती लोकांना अटक केली याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही.