शिक्षण क्षेत्रातील खऱ्या नेतृत्त्वाला मानाचा मुजरा; चक्क तुकराम मुंढेनी केले कौतुक
बातमी महाराष्ट्र

शिक्षण क्षेत्रातील खऱ्या नेतृत्त्वाला मानाचा मुजरा; चक्क तुकराम मुंढेनी केले कौतुक

मुंबई: सोलापूरमधील परितेवाडीतील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये गुरुवारी झालेल्या एका कार्यक्रमात अभिनेते स्टीव्हन फ्राय यांनी या पुरस्काराची अधिकृत घोषणा केली. ग्लोबल टीचर पुरस्कारानंतर त्यांच्यावर महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. रणजितसिंह यांच्या या कामगिरीचे कौतुक चक्क आयएएसअधिकारी तुकाराम मुंढे यांनी देखील कौतुक केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ट्वीट करत तुकाराम मुंढे यांनी म्हंटले आहे की. ” Kudos to The Real Leadership in Education’ म्हणजेच ”शिक्षण क्षेत्रातील खऱ्या नेतृत्त्वाला मानाचा मुजरा” असं ट्विट करत तुकाराम मुंढे यांनी रणजीतसिंह डिसले यांचं कौतुक केलं आहे. ७ कोटीचा ग्लोबल टीचर पुरस्कार ZP गुरुजी – रणजितसिंह डीसले यांना सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना ७ कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळवणारे ते जगातील सर्वोत्तम शिक्षक ठरले आहेत.”

याबाबत बोलताना रणजीतसिंह दिसले म्हणाले की, ”दहा वर्षे विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कामाचे योग्यवेळी फळ मिळाले- रणजित डिसले दहा वर्षे विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कामाचे योग्यवेळी फळ मिळाले. हा क्षण म्हणजे आयुष्यातील परमोच्च आनंदाचा क्षण आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने तसेच शिक्षण विभागाने मोलाचे सहकार्य केल्याची भावना ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजित डिसले यांनी व्यक्त व्यक्त क्रल्या आहेत.

जगभरातील १४० देशांतील १२ हजारांपेक्षा अधिक शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून रणजीतसिंह डिसले यांची निवड झाली आहे. युनेस्को व लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ग्लोबल टीचर पुरस्कर दिला जातो. या पुरस्काराची किंमत ७ कोटी रुपये इतकी आहे.

‘क्यूआर कोडेड’ पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती रणजीतसिंह डिसले यांनी केली आहे. विशेष म्हणजे, पुरस्काराच्या एकूण रकमेपैकी ५० टक्के रक्कम डिसले यांनी अंतिम फेरीतील ९ शिक्षकांना देण्याचे जाहीर केले आहे. यामुळे ९ देशांमधील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. डिसले यांना मिळालेली रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंडाकरीता वापरणार आहेत.

तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील डीसले यांचे कौतुक केले आहे, युनेस्को आणि लंडनच्या वार्की फाऊंडेशनकडून दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह डिसले ह्यांना मिळाला. रणजितसिंह तुमचं मनापासून अभिनंदन! तमाम महाराष्ट्राला तुमचा अभिमान वाटतोय”, असं लिहित राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे डिसले यांचे कौतुक केले.