अखेर महाराष्ट्रातही बर्ड फ्लू’चा शिरकाव झालाच; परभणीत ८०० कोंबड्यांचा बर्ड फ्लू’ने मृत्यू
बातमी महाराष्ट्र

अखेर महाराष्ट्रातही बर्ड फ्लू’चा शिरकाव झालाच; परभणीत ८०० कोंबड्यांचा बर्ड फ्लू’ने मृत्यू

परभणी : देशातील इतर राज्यांच्या पाठोपाठ आता महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात बर्ड फ्लू’ने ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे आहे. मुरूंबा येथे ही घटना घडली असून, परभणीचे जिल्हाधिकारी डी.एम. यांनी याविषयीची माहिती दिली आहे. या कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच झाला असल्याचं प्रयोगशाळेनं दिलेल्या अहवालातून स्पष्ट झालं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं कळाल्यानंतर जिल्हा प्रशासन अलर्ट झालं आहे. मुरूंबा परिसरातील एक किलोमीटर अंतरातील सर्व मारण्याचे आदेश देण्यात आले असून, दहा किमी अंतरातील कोंबड्यांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. मुरुंबा गावात कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने मुरुंबा गाव बर्ड फ्ल्यू संसर्गित म्हणून घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे या गावात कोंबड्यांचं सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी पशुसंवर्धक विभागाचं पथक या गावात तळ ठोकून आहे.

ज्या पोल्ट्री फॉर्ममध्ये ही घटना घडली. तो बचत गटाच्यावतीने चालवला जातो. पोल्ट्री फॉर्ममध्ये ८००० हजार कोंबड्या असून, त्यापैकी ८ ०० कोंबड्या मरण पावल्या आहेत. कोंबड्या मरण पावल्याची घटना घडल्यानंतर जिल्हा प्रशासनाचे नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवले होते.

त्यातून कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचं निष्पन्न झालं. तर दुसरीकडे, मुरुंबा येथे 800 कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचं उघड झालेलं असतानाच जिल्ह्यातीलच कुपटा या गावात 500 कोंबड्यांचा मृत्यूही बर्ड फ्ल्यूने झाल्याचं उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे कुपटा येथेही कोंबड्यांच्या खरेदी-विक्रीस मनाई करण्यात आली आहे.

दरम्यान, मुरुंबा गावात बर्ड फ्ल्यूचा फैलाव झाल्याने या गावाला प्रतिबंधक क्षेत्र म्हणूनही जाहीर करण्यात आलं असून या गावात कोंबड्यांची खरेदी-विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच कोंबड्यांची वाहतूक करण्यासही मनाई करण्यात आली आहे. तसेच या गावात अंडी खरेदी करण्यासही मनाई करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.