फेसबुक, ट्वीटर आणि इन्स्टाग्रामनंतर आता यूट्यूब’चाही डोनाल्ड ट्रम्प यांना दणका
बातमी विदेश

फेसबुक, ट्वीटर आणि इन्स्टाग्रामनंतर आता यूट्यूब’चाही डोनाल्ड ट्रम्प यांना दणका

अमेरिका : फेसबुक, ट्वीटर आणि इन्स्टाग्रामनंतर आता गुगलच्या मालकीच्या यूट्यूबनेही अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना दणका दिला आहे. ट्रम्प यांच्या चॅनेलवरुन अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ हा हिंसेला प्रोत्साहन देत असल्याचे कारण देत यूट्यूबने बुधवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाऊंटवर तात्पुरत्या स्वरुपाची बंदी घातली आहे. देत असल्याचे कारण देत यूट्यूबने ही कारवाई केल्याचे म्हटलं आहे. याचाच अर्थ ट्रम्प आता अध्यक्षपदावर असतानाच यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून कोणताही व्हिडीओ अपलोड करु शकत नाहीत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एएपपी या वृत्तसंस्थेनं याबाबत वृत्त दिले आहे. यूट्यूबने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रक प्रसिध्द केले आहे. “सध्या सुरु असणाऱ्या राजकीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आम्ही डोनाल्ड जे. ट्रम्प यांच्या चॅनेलवरुन अपलोड करण्यात आलेला नवीन कंटेट (व्हिडीओ) काढून टाकला आहे. हा कंटेट आमच्या धोरणांचे उल्लंघन करणारा आहे. त्यामुळे या चॅनेलवरुन आता ‘किमान’ सात दिवस नवीन कंटेट अपलोड करता येणार नाही”, असंही कंपनीने पत्रकामध्ये स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, यापूर्वीच ट्रम्प यांचे खाते ट्विटरने बंद केले होते. फेसबुक, इन्स्टाग्रामनेही ट्रम्प यांचे खाते बंद केले. फेसबुकचे कार्यकारी अध्यक्ष मार्क झुकेरबर्क यांनी ट्रम्प यांना काहीही पोस्ट करण्याची परवानगी देणं धोकादायक ठरु शकतं, असं म्हटलं होतं.

अमेरिकेसारख्या जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात ‘संसदे’वरील हल्ल्याच्या घटनेचे दुष्परिणाम पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर उद्योग जगतानेही बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली आहे. स्ट्राईप, शॉपिफायसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांसह अमेरिकेतील आघाडीच्या अनेक कंपन्यांनी ट्रम्प यांच्याशी संबंधित कंपन्यांच्या सेवा नाकारण्याचे पाऊल उचलले आहे. तर ट्रम्प यांच्या विरोधात फोर्ब्सनेही रणशिंग फुंकले असून अमेरिकेतील कंपन्यांनी ट्रम्प यांच्याबरोबर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत घेऊ नये, असा इशाराच दिला आहे.