तुम्हाला माहित आहे का? मृत्यूनंतर किती काळ कोरोना सक्रीय राहतो?
देश बातमी

तुम्हाला माहित आहे का? मृत्यूनंतर किती काळ कोरोना सक्रीय राहतो?

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असताना मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. अशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे मृतदेह कुटुंबातील सदस्य घ्यायला तयार नसतात, अशी प्रकरणे समोर येतात. यावरच आता दिल्लीतील प्रसिद्ध एम्स हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी संक्रमित व्यक्तीच्या मृत्यूनंतर किती काळ कोरोनाचे विषाणू सक्रीय असतात त्यावर रिसर्च केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे फॉरेन्सिक हेड डॉ. सुधीर गुप्ता यांनी म्हटले आहे की, एका संक्रमित व्यक्तीच्या मृत्यूनंतर १२ ते २४ तासानंतर कोरोना विषाणू नाक आणि घशात सक्रीय राहत नाही. त्यामुळे मृतापासून कोरोना संसर्गाचा धोका जास्त नाही, मृत्यूनंतर १२ ते २४ तासांच्या काळात जवळपास १०० मृतदेहांची पुन्हा कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या एक वर्षात एम्समधील फॉरेन्सिक मेडिसिन विभागात ‘कोविड -१९ पॉझिटिव्ह मेडिको-लीगल’ मृतदेहांवर अभ्यास करण्यात आला आहे. मात्र, मृतदेह हाताळणार्‍या लोकांनी खबरदारी म्हणून मास्क, ग्लोव्हज आणि पीपीई किट घालावे, असेही डॉक्टरांनी सांगितले आहे.