अलिगढ विमानतळाचं नाव बदलणार? मुख्यमंत्र्यांचे संकेत
देश बातमी

अलिगढ विमानतळाचं नाव बदलणार? मुख्यमंत्र्यांचे संकेत

लखनौ : अलिगढ विमानतळाला कल्याण सिंह यांचं नाव देण्यात येईल, असे संकेत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं शनिवारी निधन झालं. रविवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी ते बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आज, आम्ही कल्याण सिंह यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी अलीगढच्या महाराणी अहिल्याबाई होळकर स्टेडियममध्ये आणले आहेत. त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन त्यांच्या कार्यकर्त्यांना पाहता यावे, यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. कल्याण सिंह वर्षानुवर्षे अलीगढच्या लोकांशी जोडले गेले होते, असे आदित्यनाथ म्हणाले. कल्याण सिंह यांच्या निधनानंतर, अलीगढमधील भाजप नेत्यांनी नव्याने बांधण्यात आलेल्या मिनी विमानतळाला त्यांचं नाव देण्याची मागणी केली असल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांचे शनिवारी रात्री लखनऊ येथील संजय गांधी वैद्यकीय विज्ञान संस्थेत (एसजीपीजीआय) निधन झाले. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कल्याण सिंह यांनी भारतीय जनता पक्षामध्ये असताना राज्यात आणि केंद्रात अनेक महत्वाची पदे भूषवली.