पुणे बातमी

मनसे कार्यकर्त्यांकडून ॲमेझोनच्या कार्यालयाची तोडफोड

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अ‍ॅमेझॉनमधील वाद आता शिगेला पोहचला आहे. पुण्यातील कोंढवा भागातील ॲमेझोनच्या कार्यालयाची मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून ‘मराठी नाय तर अॅमेझॉन नाय’ अशी घोषणाबाजीही केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिंडोशी न्यायालयाने नोटीस पाठवल्यानंतर मनसे आक्रमक झाली असून अ‍ॅमेझॉनचं पुण्यातील कार्यालय फोडलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी काही दिवसांपूर्वी मनसेने मोहीम सुरु केली होती. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांनी सात दिवसांत मराठी भाषेत अॅप सुरू करावं, अन्यथा दिवाळी मनसे स्टाईलने होईल असा इशारा मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिला होता. यासाठी त्यांनी कंपन्यांच्या कार्यालयात जाऊन भेटही दिली होती. तसेच, मराठीला प्राधान्य देण्याच्या मनसेच्या मागणीची अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या प्रतिनिधींनी दखल घेतली होती. जेफ बेझॉस यांना तुमचा ईमेल मिळाला आहे. अ‍ॅमेझॉन अ‍ॅपबाबत तुम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. संबंधित टीमला आम्ही याची माहिती दिल्याचा ई-मेल अ‍ॅमेझॉनकडून पाठवण्यात आला होता. त्यानंतर अ‍ॅमेझॉनचं शिष्टमंडळ मुंबईत आलं होतं.

मात्र, अ‍ॅमेझॉनने न्यायालयात धाव घेतल्यानंतर हा वाद चांगलाच पेटल्याच दिसून येत आहे. दिंडोशी कोर्टाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे काही मनसे सचिवांना ५ जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचा आदेश दिला आहे. राज ठाकरेंना नोटीस पाठवल्यानंतर मनसे नेते अखिल चित्रे यांनी प्रतिक्रिया दिली. न्यायालयाने नोटीस पाठवल्यानंतर मनसेने आपण भूमिकेवर ठाम राहणार असल्याचं सांगताना यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा अ‍ॅमेझॉनला दिला होता. राज ठाकरेंना नोटीस पाठवणाऱ्या अ‍ॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार अशी प्रतिक्रिया अखिल चित्रे यांनी दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.