कोकण बातमी

आंबेडकर विचार महोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांची महाडमधील पूरग्रस्तांना मदत

महाड (ता. २८) : मुंबई येथिल राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीच्या ५० स्वयंसेवकांनी उद्योग आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाड येथे पुरामुळे मोठ्या प्रमाणात हानी झालेल्यांना आणि नूकसान झालेल्या पूरग्रस्तांसाठी जीवन उपयोगी वस्तूंचे वाटप व मदतकार्य सुरु केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या महाड शहराला पुराच्या संकटात आजूबाजूच्या ७ ते ८ गावांना पुन्हा उभे राहण्यास समितीचे ५० स्वंयसेवक चार ते पाच दिवसासाठी मदत करणार आहेत. सोबत ५ टन अन्न धान्य (तांदूळ, डाळी, ४० हजार पॉकेट्स, बिस्किटे, पाणीबॉटल) स्त्रियांसाठी १५०० साड्या व मैक्सी, झोपण्यासाठी १ हजार, चटई, १ हजार टी-शर्ट यांचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्याठिकाणची साफसफाई तथा गाळ काढण्याचे काम सुद्धा स्वयंसेवकांमार्फत करण्यात येईल.

डॉ. हर्षदीप कांबळे यांनी कोरोना काळात खूप लोकांना मदत केली. नुकतेच त्यांनी ३१ अँम्बुलन्सचे वाटप त्यांच्या पत्नी रोजाना व्हॅनिच कांबळे ह्यांच्या मदतीने केले आहे . महाडच्या खूप गरजेच्या मदती मध्येही त्यांचीही दान पारमिता आणि लोकांविषयीच्या तळमळीचा प्रत्यय पुन्हा दिसून येत आहे. महाडमध्ये आलेला पूर आणि ह्या अतिशय गरजेच्या मदत कार्यानिमित्ताने आपले ५० तरुण मुलं आणि मुली कठीण परिस्थिती राहून कुशल काम करत आहेत. बुद्धिस्ट तरुणांनी एकत्रित येऊन सर्वांसाठी काम करणे हा एक अतिशय स्तुत्य उपक्रम असून, अश्या मदत कार्याला आपण सर्वांनी सहयोग करावा ही समितीच्या वतीने विंनती करण्यात येत आहे.

दरम्यान, महाडमध्ये भारत देशातील मानव अधिकाराचा सर्वात मोठा सत्याग्रह झाला होता, जो दांडी मार्चच्या आधीचा आहे. काही लोकांनी खूप विरोध केला होता, तरी चवदार तळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या संघर्षानंतर सर्वांसाठी खुले झाले होते. नाना टिपणीससारख्या लोकांनी तेंव्हा बाबासाहेबांना खूप मदत केली. ह्या सर्व पार्श्वभूमीवर संवेदनशीलता, दान परिमिता, मैत्रीभावना, समर्पण या बुद्ध वचनांचा अनोखा मिलाप या सर्व कार्यात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.