पाकिस्तान आर्थिक संकटात; आता घेणार हा मोठा निर्णय
बातमी विदेश

पाकिस्तान आर्थिक संकटात; आता घेणार हा मोठा निर्णय

लाहोर : पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती खूपच चिंताजनक झाली आहे. पाकिस्तानवरील आर्थिक संकट दिवसोंदिवस वाढत असून आता देशाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेणाऱ्या मोहम्मद अली जिन्ना यांची निशाणी असणारी एक गोष्ट गहाण ठेवण्याची वेळ इम्रान खान सरकारवर आली आहे. पाकिस्तान सरकार आता ५०० अब्ज रुपयांचं कर्ज मिळवण्यासाठी मोहम्मद अली जिन्नांच्या बहीणीच्या नावाने असणारं लोकप्रिय पार्क गहाण ठेवण्याच्या विचारात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

इम्रान खान सरकार ५०० अब्ज रुपयांचे कर्ज मिळवण्यासाठी इस्लामाबादमधील एफ नाईन सेक्टरमधील सर्वात मोठं पार्क गहाण ठेवण्याचा विचार करत आहे. हे पार्क गहाण ठेवण्यासंदर्भातील प्रस्ताव मंगळवारी (ता. २६) कॅबिनेटच्या बैठकीत मांडला जाणार आहे.

पाकिस्तान सरकार जे पार्क गहाण ठेवण्याचा विचार करत आहे त्या पार्कचं नाव फातिमा जिन्ना पार्क आहे. मदार-ए-मिल्लत फातिमा जिन्ना पाकिस्तानचे संस्थापक असणाऱ्या मोहम्मद अली जिन्ना यांची बहीण होती. इस्लामाबादमध्ये त्यांच्या स्मृतीप्रत्यर्थ बवण्यात आलेलं हे पार्क ७५९ एकरांमध्ये पसरलेलं आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानमध्ये शहरी भागामध्ये सर्वाधिक हिरवागार प्रदेश म्हणून हे पार्क ओळखलं जातं.