पवारांचे मतपरिवर्तन करण्यासाठी देशमुखांनी मागितली २कोटींची खंडणी; वाझेंचा गौप्यस्फोट
बातमी मुंबई

पवारांचे मतपरिवर्तन करण्यासाठी देशमुखांनी मागितली २कोटींची खंडणी; वाझेंचा गौप्यस्फोट

मुंबई : निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांनी आता राज्याला हादरवून टाकणारा गंभीर गौप्यस्फोट केला आहे. आपल्या नियुक्तीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध होता. ते आपल्याला हटवू इच्छित होते. त्यांचं मतपरिवर्तन करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, असा खळबळजनक दावा सचिन वाझे यांनी एनआयएला लिहिलेल्या पत्रात केला केला आहे. इंडिया टुडेनं हे वृत्त दिलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यानंतर निलंबित पोलीस अधिकारी वाझेंनींही लेटरबॉम्ब टाकला आहे. सध्या एनआयएच्या कोठडीत असलेल्या वाझे यांनी एनआयएला एक पत्र लिहिलं आहे. ज्यात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप केला आहे.

वाझे यांनी स्वतःच्या हस्तक्षरात एनआयएला पत्र लिहिलं आहे. २०२० मध्ये मला पोलिस दलात घेण्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विरोध होता. माझी नियुक्ती रद्द करण्यात यावी, अशी शरद पवारांची इच्छा होती. मात्र, आपण शरद पवारांचं मतपरिवर्तन करू, असं तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मला सांगितलं होतं. या कामासाठी देशमुख यांनी मला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, असा दावा वाझे यांनी पत्रात केला आहे.