माजी मंत्री राहिलेल्या भाजप आमदाराचे कोरोनामुळे निधन
देश बातमी

माजी मंत्री राहिलेल्या भाजप आमदाराचे कोरोनामुळे निधन

लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयानक आहे. सरकारी आकडे दिसत नसले तरी या बातमीमुळे कोरोनाचे गंभीर स्वरुप आपल्या समोर येईल. उत्तरप्रदेशात आणखी एका भाजप आमदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रायबरेलीमधील सलोन विधानसभेचे भाजप आमदार आणि माजी मंत्री दल बहादूर कोरी यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दल बहादूर कोरी यांना एका आठवड्यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना लखनौच्या अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान आज सकाळी त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचं निधन झालं. भाजप आमदार दल बहादूर कोरी यांचा राम मंदिर आंदोलनात सक्रिय सहभाग होता. त्यांना दोनदा तुरुंगवासही भोगावा लागला आहे.

१९९१ साली त्यांना पहिल्यांदा विधानसभेचं तिकीट मिळालं. तेव्हा ते पराभूत झाले होते. त्यानंतर १९९६ साली ते सलोन विधानसभेतून निवडून आले आणि राजनाथ सिंह मुख्यमंत्री असताना मंत्रिपद मिळालं. २००४ साली दल बहादूर कोरी यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये सहभागी झाले. मात्र २०१४ साली त्यांनी पुन्हा घरवापसी करत भाजपात प्रवेश केला. त्यानंतर २०१७ साली भाजपाने त्यांना सलोन विधानसभेचं तिकीट दिलं आणि निवडून आले. उत्तरप्रदेशात आतापर्यंत भाजपच्या चार आमदारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यापूर्वी ओरैया विधानसभेचे भाजप आमदार रमेश दिवाकर, लखनौ पश्चिम विधानसभेचे सुरेश श्रीवास्तव, बरेलीच्या नवाबगंजमधील आमदार केसर सिंह गंगवार यांचं करोनामुळे निधन झाले आहे.