देश बातमी

काँग्रेस आमदाराला पोलिसांनी घरात जाऊन ठोकल्या बेड्या

नवी दिल्ली : तीन वेळा आमदार राहिलेल्या शर्मन अली अहमद यांना काँग्रेस पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. राज्यात गेल्या आठवड्यात पार पडलेल्या हटाव मोहिमेत झालेल्या हिंसाचारावर भाष्य करताना आसामचे काँग्रेस आमदार शर्मन अली अहमद यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शर्मन अली अहमद यांनी माथी भडकावणारं वक्तव्य केल्यानंतर त्यांच्याविरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. शर्मन अली अहमद यांनी दरांग जिल्ह्यात ४० वर्षांपूर्वी झालेल्या हत्या योग असल्याचं म्हटलं होतं. याच ठिकाणी गेल्या आठवड्यात हटाव मोहिम पार पडली होती. हत्या झालेल्यांना शहीद म्हणून संबोधलं जात असताना शर्मन अली अहमद यांनी त्यांता हत्यारे असा उल्लेख करत वाद निर्माण केला होता.

१९८३च्या आसाम आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मृतीचा अतिक्रमण करणाऱ्यांकडून अनादर केलं जात असल्याच्या वृत्तावर बोलताना शर्मन अली अहमद यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता, तसंच अनेक एफआयआर पण दाखल झाले होते. काँग्रेसने शर्मन अली अहमद यांना कारणे दाखवा नोटीस बजावताना राज्यात होणाऱ्या पोटनिवडणुकीत पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा हेतू असल्याचा आरोप केला आहे. तसंच राज्यातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप करण्यात आला.