कायदाचा दणका; कोरोनाचे नियम तोडल्याने खासदारांवर गुन्हा दाखल
बातमी मराठवाडा

कायदाचा दणका; कोरोनाचे नियम तोडल्याने खासदारांवर गुन्हा दाखल

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये लॉकडाउन लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण, लागू होण्याआधीच रद्द करण्यात आला. यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांची त्यांच्या समर्थकांनी विजयी मिरवणूक काढली होती. त्यानंतर या मिरवणुकीवर अनेकांनी टीका केली होती. त्यानंतर जलील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शहरात लॉकडाऊनचा निर्णयाला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी स्थगिती दिली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आणि खासदार इम्तियाज जलील यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. जलील यांना खांद्यावर बसून मिरवणूक काढण्यात आली होती. पण या मिरवणुकीत कोणीही तोंडावर मास्क वापरला नव्हता. तसंच सोशल डिस्टन्सिंगच्या नियम पायदळी तुडवण्यात आले होते.

कोरोना नियम पायदळी तुडवण्यात आल्यामुळे भाजपचे नेते संजय केनेकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. जोपर्यंत इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल होत नाही तोपर्यं मागे हटणार नाही, असा इशारा दिला होता. अखेर इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनसेचे नेते अमय खोपकर यांनी जलील यांची काढण्यात आलेल्या रॅलीवर तीव्र संताप व्यक्त केला होता.