डिसेंबर महिन्यात १४ दिवस बँका बंद ; बँकेशी संबधित कामे आधीच उरकून घ्या
देश बातमी

डिसेंबर महिन्यात १४ दिवस बँका बंद ; बँकेशी संबधित कामे आधीच उरकून घ्या

नवी दिल्ली : देशभरात येत्या डिसेंबर २०२० मध्ये १४ बँका बंद राहणार आहेत. साप्ताहिक सुट्टीसह, स्थानिक सणांमुळे बँका बंद राहणार आहेत. अनेक बँक ग्राहकांच्या कामावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर आपली बँकेची काही कामे प्रलंबित असल्यास लवकरात लवकर ती उरकून घ्या.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

3 डिसेंबरपासून सुट्ट्या सुरू होणार
3 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. 3 डिसेंबर रोजी कर्नाटकमध्ये कनकदास जयंती आणि फेस्ट ऑफ सेंट फ्रान्सिस झेवियरची सुट्टी असेल. तर 6 तारखेला रविवारची बँकेची साप्ताहिक सुट्टी असेल. यानंतर 12 डिसेंबर हा डिसेंबरचा दुसरा शनिवार आणि 13 डिसेंबरला पुन्हा रविवार असल्याने या दिवशीदेखील साप्ताहिक सुट्टी असेल.

गोवा राज्यात 17, 18 19 ला सुट्टी
गोव्यामध्ये 17 डिसेंबर रोजी लॉसोंग पर्व, 18 डिसेंबर रोजी पुण्यतिथी यू सो सो थम आणि 19 रोजी गोवा मुक्ती दिनानिमित्त सुट्टी असेल. यानंतर 20 तारखेला रविवार असल्याने बँकांना आठवड्याची साप्ताहिक सुट्टी असेल.

२५ आणि २६ डिसेंबरला नाताळाची दोन दिवस सुट्टी
24 डिसेंबर आणि 25 डिसेंबरला नाताळाची सुट्टी असेल. तसेच 26 डिसेंबर रोजी महिन्याच्या चौथ्या शनिवारी साप्ताहिक सुट्टी असेल आणि 27 डिसेंबर रोजी रविवार असल्याने आठवड्याला सुट्टी असेल. दुसरीकडे 30 डिसेंबरला यू किअंग नंगबाह आणि 31 डिसेंबरला थर्टी फर्स्टची काही राज्यात सुट्टी असेल.