५ जानेवारीलाच हजर राहा; ईडीने वर्षा राऊतांना पुन्हा बजावलं समन्स
बातमी महाराष्ट्र

५ जानेवारीलाच हजर राहा; ईडीने वर्षा राऊतांना पुन्हा बजावलं समन्स

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नव्याने नोटीस पाठवली आहे. ईडीने वर्षा राऊत यांना 5 जानेवारी 2021 रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. वर्षा राऊत यांनी EDला पत्र पाठवून ५ जानेवारीपर्यंतचा वेळ मागून घेतल्याची बातमी समोर आली होती. मात्र आता ईडीने 5 जानेवारीलाच हजार राहण्यास सांगितले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्या अकाऊंटमधून जवळपास 55 लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आले होते. हा पैशाचा व्यवहार नेमका कशामुळे करण्यात आला, याबाबत ईडीला माहिती हवी आहे. प्रवीण राऊत आणि त्यांच्या पत्नीचे यापूर्वीच जबाब नोंदवण्यात आले असून, फक्त वर्षा राऊत यांचा जबाब नोंदवणं बाकी आहे.

तर सुनील राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, असं कुठलंही पत्र EDला पाठवण्यात आलं नाही. तसंच वर्षा राऊत आज EDला सामोऱ्या जाणार का? याबाबतही अद्याप निर्णय नाहीये. वर्षा राऊत यांना पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली होती. बँकेतील खात्याशी संबंधित कागदपत्रं घेऊन कार्यालयात येण्यास नोटिशीत सांगण्यात आले होते.