माजी खासदार सुनिल गायकवाड यांनी मारहाण प्रकरणी अनुसुचित जातीच्या कुटुंबियांची घेतली भेट
बातमी मराठवाडा

माजी खासदार सुनिल गायकवाड यांनी मारहाण प्रकरणी अनुसुचित जातीच्या कुटुंबियांची घेतली भेट

निलंगा : लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील एका गावात दलित कुटुंबियांना मारहाण झाल्याची घटना नुकतीच घडली. लातूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार आणि विश्व दलित परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष (आंतरराष्ट्रीय चळवळ) डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांनी भेट घेत सात्वंन केले असून सर्वोत्परी मदत करणार असल्याचे सांगितले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एका दलित कुटुंबाने सवर्ण महिलेकडून 8 एकर शेतजमीन विकत घेतली होती. त्यानंतर शेतजमीन कसण्यासाठी जेव्हा हे दलित कुटुंब शेतात गेले. तेव्हा त्यांना मारहाण करुन त्रास देण्यात आला. जातिभेदाच्या त्रस्त मानसिकतेमुळे दलित समाजातील शेतकऱ्यांना मारहाण व जखमी करण्यात आले. केवळ दलित असल्यामुळे त्यांना त्यांच्या शेतात काम करू दिले जात नाही. याकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने गंभिरतेने पाहायला हवे, असल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे. या पीडित दलित कुटूंबाला न्याय मिळावा यासाठी नुकसान भरपाई व इतर सर्व मदत मिळावी यासाठी डॉ. गायकवाड यांनी दलित कुटुंबाच्या गावी घरी जाऊन भेट घेतली असून पुढे मदत करणार असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.

दलित समाज, विश्व दलित परिषद, अखिल भारतीय चमार महार जाट महासभा, सेवा न्याय उत्थान फाउंडेशन, आणि सर्व सहयोगी संस्था या कुटुंबाच्या पाठीमागे ठामपणे उभ्या असल्याचे यावेळी गायकवाड म्हणाले.