लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या पाचात एकाही भाजपशासित मुख्यमंत्र्यांना नाही स्थान
देश बातमी

लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिल्या पाचात एकाही भाजपशासित मुख्यमंत्र्यांना नाही स्थान

नवी दिल्ली : देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांचे सर्वेक्षण नुकतेच करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत पहिप्या पाचमध्ये एकाही भाजपशासित मुख्यमंत्र्यांचे नाव नाही.एकूण ११मध्ये ९ मुख्यमंत्री गैर भाजपाशासित राज्यातील आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना २९ टक्के लोकांची पसंती आहे. तर टॉप पाच मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांचं नाव आहे. या सर्व्हेत लोकांची मतं जाणून घेतल्यानंतर निष्कर्ष काढण्यात आला आहे. इंडिया टुडे मूड ऑफ द नेशननं हे सर्वेक्षण केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत एमके स्टॅलिन यांचं नाव आघाडीवर आहे. दुसऱ्या क्रमांकावर ओडिशाचे मुख्यमंत्री नविन पटनायक आहेत. केरळचे मुख्यमंत्री पी विजयन तिसऱ्या, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चौथ्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पाचव्या क्रमांकावर आहेत. या यादीत भाजपाशासित राज्यातील दोन मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा हे सहाव्या स्थानी तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं नाव सातव्या स्थानी आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे आठव्या स्थानी असून दिल्लीचे मुख्ममंत्री अरविंद केजरीवाल यांचं नाव या यादीत नवव्या स्थानी आहे.