#भारतबंद : कुठे संमिश्र प्रतिसाद तर कुठे आंदोलनकर्त्यांची धरपकड
बातमी महाराष्ट्र

#भारतबंद : कुठे संमिश्र प्रतिसाद तर कुठे आंदोलनकर्त्यांची धरपकड

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांवरुन देशातील विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. दिल्लीच्या वेशीवर कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी वेढा दिला आहे. अशातच केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये सलग चर्चा सुरु आहेत. तसेच सरकारकडून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पाचवी बैठक निष्फळ ठरल्यानंतर आता शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये सहावी बैठक उद्या म्हणजेच, 9 डिसेंबरला होणार आहे. देशासह राज्यातील अनेक कृषी संघटनांसह राजकीय पक्षांनीदेखील सहभाग घेतला आहे. राज्यात भारत बंदच्या पार्शभूमीवर काय काय परिस्थिती आहे, याचा आढावा.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

‘भारत बंद’मध्ये काँग्रेस पक्षाच्या सगळ्या शाखा भाग घेतील; असा आदेश देण्याबाबत सगळ्या प्रदेश शाखांच्या पक्षनेत्यांना राहुल गांधी यांनी दिले आहेत. त्याचबरोबर जिल्हा स्तरावर त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा म्हणून निदर्शने करावीत. तसेच, राज्यात महाविकास आघाडीनेही भारत बंदला पाठिंबा दिला असून आज राज्यात बंद ठेवण्याचं सांगण्यात आलं आहे.

भारत बंदला मालेगावमध्ये संमिश्र प्रतिसाद
मालेगाव (नाशिक) :- कृषी कायद्याविरोधात पुकारलेल्या .बाजार समितीच्या मुख्य मुख्य आवारातील लिलाव तसेच मुंगसे व झोडगे उपबाजारात लिलावात भाग बाजारातील लिलाव बंद ठेवण्यात आली होती शहरातील काही दुकाने बंद होती दाभाडी येथे शेतकऱ्यांनी निवेदन सादर करून केंद्र शासनाचा निषेध केला.

राष्ट्रवादीच्या आंदोलनकर्त्यांना ठाण्यात अटक
ठाणे : ठाणे येथील रेस्ट हाउसच्या बाहेर आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ केंद्र सरकार च्या विरोधात आंदोलन केले या वेळी आंदोलन कर्त्यांना अटक करण्यात आली. भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने ठाण्यात जोरदार आंदोलन करून ठाणे बंद करण्याचा प्रयत्न केला. यावेळी कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भारत बंदला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे ठाणे शहरात राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठाणे स्टेशन येथे आंदोलन केले.

पिंपरीत भारत बंद’ला संमिश्र प्रतिसाद; दुकाने मात्र खुली
कृषी कायदा बदलाच्या विरोधात पंजाब आणि हरियाणा येथील शेतकऱ्यांचे दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरू असून आज भारत बंदची हाक त्यांनी दिली आहे. त्याला अवघ्या देशातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत काही प्रमाणात दुकाने बंद आहेत, तर इतर ठिकाणी दुकाने सुरू असल्याचं चित्र आहे. एकूण पाहता शेतकऱ्यांच्या भारत बंदला शहरातून संमिश्र प्रतिसाद आहे.

मुंबईच्या दिशेने निघालेल्या शिखांच्या रॅलीला पोलिसांनी अडवलं
मुंबईच्या दिशेने निघालेल्या शिखांच्या रॅलीला पोलिसांनी अडवलं आहे. मानखुर्द येथे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडवलं असल्याने वाशी उड्डाणपूलावर वाहतुकीची कोंडी झाली आहे. मुंबईला जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.

कोल्हापुरात जिल्हा काँग्रेस कार्यालयात काळे झेंडे
कोल्हापूर: भाजपा सरकारने लादलेले कृषी विरोधी काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी आज ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनामध्ये सहभाग घेण्यासाठीं व या कायद्यांना विरोध करण्यासाठीं आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कार्यालयात ‘काळा झेंडा’ उभारण्यात आला. पालकमंत्री व कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सतेज पाटीलयांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

साताऱ्यात आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड :                                                         बाजार समित्यांच्या आवारामध्ये शांतता; जिल्ह्यात भारत बंदला शंभर टक्के प्रतिसाद सातारा : केंद्र सरकारने मंजूर केलेले शेतकरी कायदे त्वरित रद्द करावेत शेतमालाला हमीभाव जाहीर करावा, या मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सातारा जिल्ह्यात ठिकाणी मंगळवारी बंद पाळण्यात आला. या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने सातारा शहरातून रॅली काढणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.