सोन्या चांदीच्या भावात मोठी घसरण; पाहा आजचे दर
देश बातमी

सोन्या चांदीच्या भावात मोठी घसरण; पाहा आजचे दर

मुंबई : सोन्याचांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोन्याचांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. सोन्याचे दर गेल्या चार महिन्यातील निचांकी पातळीवर आहेत. मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे दर 46 हजार रुपये प्रति तोळ्यापेक्षा कमी झाले आहेत. यानंतर सोन्याचे दर गेल्या चार महिन्यातील निचांकी स्तरावर आहेत. एमसीएक्सवर गेल्या तीन सत्रात सोन्याचे दर जवळपास 1.3 टक्क्यांनी कमी झाले आहेत. या दरम्यान चांदीचे दरही १.५ टक्क्यांनी कमी झाले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आज बुधवारी सोन्याचे दर कमी झाले आहेत. एमसीएक्सवर आज सकाळी सोन्याचे दर 0.13 टक्क्यांनी किरकोळ वाढ झाली आहे. तर चांदीचे दर आज मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. मंगळवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 176 रुपयांनी कमी झाले आहेत, यानंतर दर 45 हजार 110 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले होते. तर चांदीचे दर 898 रुपये प्रति किलोने कमी होऊन 61 हजार 715 रुपये प्रति किलोवर पोहोचले होते.

सोन्याचे दर सर्वोच्च स्तरापेक्षा 11000 रुपयांनी स्वस्त आहेत. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56 हजार 200 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. सध्या सोन्याचे दर सराफा बाजारात 45 हजार रुपये प्रति तोळ्याच्या आसपास आहेत.