देश बातमी

बलिया गोळीबार प्रकरणातील आरोपी धीरेंद्र सिंह यांना भाजपा नेत्याचे जाहीर समर्थन

उत्तरप्रदेश : बलिया गोळीबारातील मुख्य आरोपी धीरेंद्र सिंह यांना भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह उघडपणे समर्थनार्थ दिले आहे. आज सकाळी ते रेवती पोलिस स्टेशनमध्ये दुसर्‍या पक्षाविरोधात तक्रार देण्यासाठी दाखल झाले. यावेळी त्यांनी ”धीरेंद्र प्रताप सिंह आणि त्यांच्या समर्थकांवर दुसर्‍या पक्षाने प्रथम हल्ला केला. त्यामुळे दुसऱ्या पक्षाविरोधात गुन्हा नोंदविला गेला नाही तर ते धरणे आंदोलन करतील, असा इशारा सुरेंद्र सिंह यांनी दिला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यापूर्वीही सुरेंद्र सिंह म्हणाले होते की, धीरेंद्र प्रताप सिंहने स्वसंरक्षणार्थ गोळी झाडली असल्याचा दावा केला होता. तथापि, सुरेंद्रसिंह यांनी जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेतलेल्या जखमींपैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर दुसरीकडे, आमदार सुरेंद्र सिंह यांच्या विधानामुळे योगी सरकार प्रचंड अस्वस्थ झाले आहे. मात्र विरोधी पक्षाने याचा फायदा घेत योगी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.

तसेच,समाजवादी पक्षाचे प्रवक्ते अनुराग भदौरिया यांनीदेखील या योगी सरकारवर निशाणा साधला आहे. ”दीड वर्षांपूर्वी धीरेंद्र सिंग यांनी पुरवठा निरीक्षकाला शिवीगाळ करून रेशन दुकानांच्या वाटपासंबधी दबाव टाकला होता. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला, परंतु कोणालाही अटक करण्यात आली नाही. भाजपच्या राजवटीत गुंडाराज का वाढत आहे, हे आता माहित झाले आहे. योगी राजात फक्त गुंडांचे मनोबल वाढले आहे.” अशा शब्दात अनुराग भदौरिया यांनी योगी सरकारवर टीका केली आहे.

२५ हजारांचे बक्षीस जाहीर केले
दरम्यान, बलिया गोळीबारातील मुख्य आरोपी धीरेंद्र सिंहला 6 आरोपींविरूद्ध पोलिसांनी 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. रेवती पोलीस स्टेशन परिसरातील दुर्जनपूर गावात 15 ऑक्टोबर रोजी घडलेल्या घटनेनंतर फरार आरोपींची बातमी देण्यासाठी एसपी बलिया यांनी या बक्षिसाची रक्कम जाहीर केली.

बलिया येथील रेवती पोलिस स्टेशनच्या दुर्जनपूर गावात 15 ऑक्टोबर रोजी पोलिस आणि जिल्हा प्रशासनाच्या उच्च अधिकाऱ्यांच्या समोरच एका तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. कोटा दुकानासाठी एसडीएम व सीओ यांच्या उपस्थितीत गावात खुली बैठक सुरू असताना ही घटना घडली. या प्रकरणातील मुख्य आरोपी धीरेंद्र प्रताप सिंह आहे, जो अद्याप फरार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत