पश्चिम महाराष्ट्र बातमी

धक्कादायक! कोल्हापुरात सात वर्षाच्या मुलाचा नरबळी?

कोल्हापूर : कोल्हापुरात सात वर्षाच्या मुलाच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. सात वर्षाच्या या चिमुरड्याचं अपहरण करण्यात आलं होतं. अपहरण केल्यानंतर त्याची हत्या करुन मृतदेह एका घराच्या मागे फेकून देण्यात आल्याची घटना घडली आहे. मृतदेहावर हळद कुंकू लावून टाकण्यात आल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोल्हापूरमधील कापशीमध्ये हा प्रकार घडला असून एकच खळबळ माजली आहे. आरव केशव केशरे असं या सात वर्षाच्या चिमुरड्याचं नाव आहे. घराबाहेर खेळत असताना दोन दिवसांपूर्वी आरवचं अपहरण झालं होतं. यानंतर पोलिसांसोबतच गावकऱ्यांकडून आरवचा शोध घेतला जात होता. मात्र त्याचा शोध लागत नव्हता. त्यानंतर मंगळवारी पहाटे सहा वाजता गावापासून दूर असणाऱ्या एका जुन्या घराच्या मागे आरवचा मृतदेह सापडला. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

गेल्या महिन्यात बालकाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आल्याचा प्रकार कागल तालुक्यात घडला होता. मुरगूड येथील या बालकाचे अपहरण झाले होते. विशेष म्हणजे मित्राच्या मुलाचेच अपहरण करून खून केल्याची माहिती समोर आली होती. वरद रवींद्र पाटील असे या खून झालेल्या मुलाचे नाव होते. तर, याप्रकरणी पोलिसांनी मारुती वैद्य या आरोपीला ताब्यात घेतले होते.