ब्रेकिंग! मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन; तपास सुरु
बातमी मुंबई

ब्रेकिंग! मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन; तपास सुरु

मुंबई : मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी एका निनावी फोनद्वारे देण्यात आली आहे. त्यानंतर मंत्रालयात बॉम्बशोधक पथक दाखल झाले आहे. मंत्रालयातील कंट्रोल रूमला बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन आल्याची माहिती मिळत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

निनावी धमकीचा फोन आल्यानंतर मंत्रालयातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून कथित बॉम्बचा तपास सुरु आहे. साधारण एक तासाभरापूर्वी धमकीचा निनावी फोन मंत्रालयाला आला होता.

एक संशयित वस्तू मंत्रालय परिसरात ठेवण्यात आल्याचे फोनवरुन सांगण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. त्यानुसार बॉम्बशोधक पथक आणि मुंबई पोलीसांचे पथक याठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे. तसेच मोठा फौजफाटाही मंत्रालय परिसरात तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, मंत्रालयाच्या आतल्या बाजूला पोलिसांसोबतच बॉम्बशोधक पथक कोणती संशयास्पद वस्तू आहे का याचा शोध घेत आहे.