ब्राझीलचा भारताकडून लस घेण्यास नकार, मोठी ऑर्डर रद्द
बातमी विदेश

ब्राझीलचा भारताकडून लस घेण्यास नकार, मोठी ऑर्डर रद्द

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच ब्राझीलने भारताकडून लस घेण्यास नकार दिला आहे. ब्राझीलच्या आरोग्य नियामक संस्थेने भारतात तयार झालेल्या कोव्हॅक्सिनच्या आयातीस नकार दिला आहे. ब्राझीलनं या व्हॅक्सिनच्या दोन कोटी डोसची ऑर्डर दिली होती. अमेरिकेनंतर ब्राझील सर्वाधिक कोरोना प्रभावित देश आहे. मात्र भारत बायोटेक कंपनीच्या प्रकल्पाकडून सध्याच्या लस उत्पादन गरजा व अटींचे पालन होताना दिसत नाही, असा शेरा ब्राझीलनं दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारत बायोटेककडून प्रतिक्रिया आली असून ब्राझीलसोबत याबाबत चर्चा सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कंपनीच्या निर्मात्यांनी म्हटलं, की ब्राझीलनं सांगितलेल्या गरजांची पूर्तता केली जाईल. त्यांनी सांगितलं की गरजा पूर्ण करण्यासाठीच्या वेळेबद्दल ब्राझीलसोबत चर्चा सुरू आहे आणि लवकरच यावर मार्ग काढला जाईल.

हैद्राबाद स्थित कंपनीनं म्हटले आहे की तपासणीदरम्यान समोर आलेल्या मुद्द्यांवर काम सुरू आहे. सोबतच ब्राझीलनं दोन कोटी डोसची ऑर्डर रद्द केली नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. सध्या भारतात कॉव्हॅक्सिन आणि पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं तयार केलेल्या कोविशील्डचा वापर केला जात आहे. भारतात ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं कोव्हॅक्सिनच्या आपात्कालीन वापरास जानेवारीमध्ये परवानगी दिली आहे.