कोरोना नियमावलीचा भंग केल्याने राष्ट्रपतींनाच दंड
बातमी विदेश

कोरोना नियमावलीचा भंग केल्याने राष्ट्रपतींनाच दंड

ब्राझीलिया : ब्राझीलमध्ये कोरोना नियमावलीचाा भंग केल्याप्रकरणी राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांनाचा दंड ठोठावण्यात आला आहे. ब्राझीलमध्ये मागच्या काही महिन्यांपासून कोरोनाचा कहर सुरुच आहे. त्यामुळे आरोग्य विषयक नियमावली कठोर कारवाई करण्यात आली आहे. त्यात आता राष्ट्रपती बोलसोनारो यांची भर पडली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मारान्होमध्ये राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांच्या उपस्थित एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या ठिकाणी नियमांची पायमल्ली झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांना दंड ठोठावण्यात आला आहे. मारान्होमधील कार्यक्रमात कोरोना नियमांचा भंग झाला. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणं योग्य आहे. कायदा हा सर्वांना समान आहे, असं मारान्होचे राज्यपाल फ्लेव्हिओ डिनो यांनी सांगितलं आहे. राज्यात १००हून अधिक लोकं एकत्र येण्यावर बंदी आहे आणि मास्क घालणंही बंधनकारक आहे, अशी आठवणही त्यांनी करून दिली. राष्ट्रपती बोलसोनारो यांना उत्तर देण्यासाठी १५ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. त्यानंतर दंडाची रक्कम निश्चित केली जाणार आहे.

दरम्यान, यापूर्वी थायलंडचे पंतप्रधान प्रयुथ चान ओचा यांना सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होतं. ओचा यांच्याकडून १९० डॉलर म्हणजेच जवळजवळ १४ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. नुकताच थायलंडमध्ये मास्क न घालण्यासंदर्भातील गुन्ह्यासाठी दंड वाढवून ४७ हजार रुपये इतका करण्यात आला आहे.