कोकण बातमी

काशीदमध्ये पूल कोसळल्याने अलिबाग-मुरुड वाहतूक विस्कळीत

अलिबाग : अलिबाग-मुरुड मार्गावर काशीद येथील छोटा पूल कोसळला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जीर्ण झालेला हा पूल अतिवृष्टीमुळे कोसळला असून यावेळी पूलावरील दोन वाहने देखील कोसळली मात्र सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. सहा जणांना वाहनांमधून सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. तर, काही वाहनं वाहून गेली असून काही वाहनं बाहेर काढण्यात यश आले आहे.

दरम्यान या मार्गावरील वाहतूक सुपेगाव मार्गे वळविण्यात आली आहे. पूल जीर्ण झाला आहे त्यामुळे पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.