अदानी समूह मालामाल; बंदर उद्योगात तीन महिन्यात एवढ्या कोटींचा नफा
देश बातमी

अदानी समूह मालामाल; बंदर उद्योगात तीन महिन्यात एवढ्या कोटींचा नफा

नवी दिल्ली : अदानी पोर्ट्स अ‍ॅण्ड स्पेशल इकनॉमिक झोन लिमिटेडने (एपीएसईझेड) मंगळवारी आपल्या नफ्यामध्ये १६.२२ टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगितले आहे. डिसेंबर २०२०ला संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीला १ हजार ५७६ कोटी ३३ लाख रुपये इतका नफा झाल्याचे कंपनीने स्पष्ट केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मागील वर्षी याच कालावधीमध्ये कंपनीला एक हजार ३५६ कोटी ४३ लाख रुपये इतका नफा झाला होता. कंपनीनेच बीएसईला दिलेल्या माहितीमध्ये ही आकडेवारी देण्यात आली आहे. कंपनीची एकूण कमाई ही तिसऱ्या तिमाहीमध्ये चार हजार २७४ कोटी ७९ लाख रुपये इतकी आहे. वर्षभरापूर्वी हा आकडा तीन हजार ८३० कोटी ४३ लाख इतका होता.

कंपनीने दिलेल्या खर्चाच्या हिशोबानुसार कंपनीने यंदाच्या तिहामीमध्ये दोन हजार २५८ कोटी ६२ लाख रुपये खर्च केले आहेत. मागील वर्षी याच तिमाहीमध्ये हा आकडा दोन हजार ९१ कोटी ४० लाख रुपये इतका होता.

अदानी उद्योग समुहातील बंदरे आणि त्यासंदर्भातील व्यापाराचे काम करणारी एपीएसईझेड ही भारतामधील सर्वात मोठी बंदर निर्मिती आणि वाहतूक कंपनी आहे. भारतामधील १२ महत्वाच्या ठिकाणी एपीएसईझेडची केंद्र आहेत. यामध्ये मुंद्रा, दाहीज, कांडला, हजीरा या गुजरातमधील चार, ओदिशामधील धामरा, गोव्यातील मोरमूगाव, आंध्रमधील विशाखापट्टणम आणि कृष्णापट्टणम तसेच चेन्नईमधील कत्तुपाली, एन्नोरे येथे एपीएसईझेडचा व्यापार चालतो.