भारत-पाकिस्तान सीमेवर बोगदा; सुरक्षा यंत्रणेकडून तपास सुरु
देश बातमी

भारत-पाकिस्तान सीमेवर बोगदा; सुरक्षा यंत्रणेकडून तपास सुरु

जम्मू : बीएसएफच्या जवानांनी हीरानगर सेक्टरमधील पानसर येथे पुन्हा एक बोगदा शोधून काढला असून सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पुन्हा एकदा पाकिस्तानचा डाव मोडून काढला आहे. अवघ्या दहा दिवसांच्या आत सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना दुसरा बोगदा शोधण्यात यश मिळाल आहे. हा बोगदा १५० मीटर लांब असून ३० फूट खोल आहे. पाकिस्तानी गुप्तचर विभागाने भारतात घुसखोरी करण्यासाठी हा कट रचला असल्याचे बोलले जात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पाकिस्तानी दहशतवादी कायम भारताविरोधात कट रचत असतात. याआधी पाकिस्तानमधील शंक्करगड भागात एक बोगदा अढळला होता. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार बीएफएस जवानांच्या तुकड्या तात्काळ या कामासाठी रवाना झाल्या. त्यानंतर आज हीरानगर सेक्टरमध्ये १५० मीटर लांब असून ३० फूट खोल बोगदा अढळला.

सांबा, हीरानगर आणि कठुआ या क्षेत्रात गेल्या सहा महिन्यात अढळलेला हा चौथा बोगदा असून जम्मू क्षेत्रातील दहावा बोगदा आहे. म्हणून बीएसएफचे जवान पाकिस्तानच्या कुरापतींवर सतत नजर ठेवून आहेत. भारतात घुसखोरी करण्यासाठी तयार करण्यात आलेले हे बोगदे इंजीनियर व्यक्तीच्या मदतीने करण्यात आल्याची माहिती सुरक्षा विभागाने दिली आहे. सुरक्षा यंत्रणा याबाबत अधिक तपास करत आहे.