अर्थसंकल्पीय अधिवेशन: आरोग्य सेवांसाठी राज्यसरकारची मोठी घोषणा
बातमी महाराष्ट्र

अर्थसंकल्पीय अधिवेशन: आरोग्य सेवांसाठी राज्यसरकारची मोठी घोषणा

मुंबई : कोरोना महामारी काळातही राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडत आहे. मुंबईसह राज्यभरात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले असताना अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरोग्य सेवांसाठी मोठी घोषणा केली आहे. राज्यसरकारकडून सरकारकडून आरोग्य विभागासाठी ७ हजार ५०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात असल्याची माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. त्यांनी सोमवारी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर केला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अर्थसंकल्पाच्या सुरुवातीला अजित पवार यांनी सर्व कोविड योद्धांचे आभार मानले. महिलांसाठी विशेष योजना सुरू करण्याचा मानस आहे. महाराष्ट्र कधीही संकटापुढे झुकला नाही. सध्या कोरोनाचं संकट आहे. आपल्या सर्वांसमोर अनेक आव्हानं असल्याचं ते म्हणाले. कोरोनाच्या संकटात आरोग्य सेवांसाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली आहे. सरकारकडून आरोग्य विभागासाठी ७ हजार २०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

राज्यातील ११ परिचारिक प्रशिक्षण वर्गांचे महाविद्यालयात रुपांतर करणार येणार आहे. सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, रायगड, सातारा येथे वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात येतील. तसंच रुग्णालयांमध्ये आग प्रतिबंधात्मक उपकरणंही लावण्यात येणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये कोविड उपचार केंद्र सुरू करण्यात येईल. लातूरच्या रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण इमारतीसाठी ७३ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. याशिवाय ससून रुग्णालयातील कर्मचारी निवासासाठी २८ कोटी रुपये मंजूर करण्यात करण्यात आल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.