बातमी विदर्भ

आत्महत्यांचे सत्र थांबेना! अमरावतीत व्यावसायिकाची आत्महत्या

अमरावती : कोरोनानंतर व्यावसायिकांच्या आत्महत्यांच्या सत्रात वाढ झाली आहे. नैराश्यातून अमरावतीतील एका व्यावसायिकाने रेल्वेगाडीसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अमरावतीवरून बडनेराच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेमार्गावर या व्यावसायिकाच्या शरीराचे सहा ते सात तुकडे सुमारे अर्धा किलोमीटर सापडले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राजेश दादासाहेब दानखेडे (वय ५९, रा. शंकरनगर, अमरावती) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजताच्या सुमारास राजापेठ पोलिसांना माहिती मिळाली की, अमरावती ते बडनेरा रेल्वेमार्गावरील नवाथे परिसरातील हॉटेलच्या मागे एका व्यक्तीचा मृतदेह पडलेला आहे. सुरुवातीला सुमारे चार ते पाच तास मृतदेहाची ओळख पटली नव्हती. मात्र मृताच्या अंगावरील कपडे व वर्णनाच्या आधारे उशिरा रात्री ओळख पटवण्यात राजापेठ पोलिसांना यश आले.

यावेळी मृत व्यक्तीने मुलांच्या व पत्नीच्या नावे चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यांनी मुलांना व पत्नीला माफ करा, असे म्हणून तुम्हाला खुशी देऊ शकलो नसल्याचे सांगितले. तसेच मुलांनो आईची काळजी घ्या, असाही त्यांनी चिठ्ठीत उल्लेख केला आहे. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.