व्यावसायिकाची डोक्यात गोळ्या झाडून हत्या; पोलिसांकडून २४ तासांत छडा
बातमी विदर्भ

व्यावसायिकाची डोक्यात गोळ्या झाडून हत्या; पोलिसांकडून २४ तासांत छडा

गोंदिया : गोंदिया शहरात व्यावसायिकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी डोक्यात गोळ्या झाडून हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गोंदिया शहरातील गणेश नगर येथे राहणारे अशोक कौशिक या ट्रान्सपोर्ट व्यवसायिकाची मॉर्निग वाकला जात असतांना एका अज्ञात आरोपीने पाठीमागून येत त्यांच्या डोक्यात गोळ्या झाडून हत्या केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हत्येनंतर आरोपीने घटना स्थळापासून काही अंतरावर बंदूक फेकून देत पळ काढली. या घटनेने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर पोलिसांनी 24 तासांच्या आत तीन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. अशोक कौशिक यांचा सर्कस ग्राउंड परिसरात एनसीसी नावाने ट्रान्सपोर्ट व्यवसाय असून ते रोजच्या प्रमाणे शनिवारी देखील सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान घराबाहेर निघत सर्कस ग्राउंडकडे जात असताना एका अज्ञात इसमाने पाठी मागून येत त्यांच्या मानेवर बंदुकीने गोळी झाडत पळ काढला. यावेळी त्याने स्वतः जवळील बंदूक देखील आरोपीने घटनास्थळी फेकून दिली.

दरम्यान रस्त्यावर जाणाऱ्या लोकांनी अशोक यांचे मृतदेह पाहता गोंदिया शहर पोलिसांना याची माहिती दिली. यावेळी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले असून गोंदिया शहर पोलीस घटनेचा तपास करीत आहेत. अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा नोंद करून आरोपींच्या शोध सुरू केला. पोलिसांनी सतिश बनकर, चिंटू शर्मा व दीपक भूते यांना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.