भारत नेट प्रोजेक्टसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; मिळणार एवढे कोटी
देश बातमी

भारत नेट प्रोजेक्टसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; मिळणार एवढे कोटी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध आर्थिक योजनांना मंजुरी देण्यात आली. कोरोना संकटासाठी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी ६ लाख २८ हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं होतं. या निर्णयाला दोन दिवसात मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. भारत नेट प्रोजेक्टसाठी १९ हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

टेलिकॉम सेक्टरसाठीही केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेले आहेत. सूचना आणि माहिती सर्व गावांपर्यंत पोहोचण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचं केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं. त्यासाठी मंत्रिमंडळाने भारत नेट प्रोजेक्टसाठी १९ हजार कोटी रुपयांची मंजुरी दिली. १५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजार दिवसात सर्व गावात ब्रॉडब्रँड सुविधा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर भारत नेट नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क प्रोगाम अंतर्गत काम सुरु करण्यात आलं होतं. देशाच्या १६ राज्यात भारत नेटला पीपीपी मॉडेल अंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे. या प्रोजेक्टसाठी २९ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. या प्रोजेक्टसाठी केंद्र सरकार १९ हजार कोटी रुपये देणार आहे.

घोषणा केल्यानंतर एक निवडणूक झाल्यानंतर आधीचे सरकार निर्णय घेत होते. मात्र आम्ही घोषणा केली आणि निर्णयही घेतला आहे. मोदी सरकार जे बोलतं ते करतं, असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यावेळी सांगितलं.