भाजप खासदारांविरुद्ध वर्धा पोलिसांत गुन्हा दाखल
बातमी विदर्भ

भाजप खासदारांविरुद्ध वर्धा पोलिसांत गुन्हा दाखल

वर्धा : भाजप खासदार रामदास तडस यांच्याविरुद्ध वर्धा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. वर्ध्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी आमदार रणजित कांबळे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी भाजपचे खासदार रामदास तडस यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप असून, याप्रकरणी खासदार तडस यांच्यासह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्ध्यातील रामनगर पोलिसांत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

वर्ध्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांना शिवीगाळ आणि धमकी देणाऱ्या माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांना अटक करण्याची मागणी भाजपचे खासदार रामदास तडस यांनी केली होती.

अटकेच्या मागणीसाठी तडस यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत करोना नियमांचं पालन करण्यात न आल्याचं निदर्शनास आलं असून, याप्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निगरानी पथकाने दिलेल्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात खासदार रामदास तडस आणि आयोजक पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. पोलीस अधिकारी धनाजी जळक यांनी ही माहिती दिली.