३ महिन्यांत भारताने ९५ देशांना दिल्या लशी; एवढ्या मोफत तर एवढ्या विकत
देश बातमी

३ महिन्यांत भारताने ९५ देशांना दिल्या लशी; एवढ्या मोफत तर एवढ्या विकत

नवी दिल्ली : कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. मात्र, लशीची कमतरता असल्याने अनेक ठिकाणी कासवगतीने लसीकरण सुरु आहे. २१ जून पासून केंद्राने १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण मोफत करण्याची घोषणा केली. मात्र, लसटंचाई अजुनही दिसून येत आहे. भारत सरकारने ३ महिन्यांत ९५ देशांना ६ कोटी ६३ लाख ७० हजार डोस वितरित केले. त्यापैकी १ कोटी ७ लाख १५ हजार डोस मोफत वितरित केले गेले आहेत. आरटीआयमध्ये ही माहिती मिळाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कॉंग्रेसचे प्रवक्ते अब्बास हफीझ यांनी याबाबत आरटीआयव्दारे सरकारला माहिती मागितली होती. आरटीआयला उत्तर देतांना परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारताने २२ जानेवारी ते १६ एप्रिल या कालावधीत कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड लस ९५ देशांना पाठविली आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, अब्बास हफीझ म्हणतात की, परराष्ट्र मंत्रालयाने आरटीआयमध्ये सांगितले आहे की सरकारने वेगवेगळ्या देशांमध्ये १ कोटी ७ लाख १५ हजार लशींचे मोफत वितरण केले आहे.

कोणत्या देशाला किती लस?
बांगलादेश – ३३ लाख डोस मोफत आणि ७० लाख डोस विकत
म्यानमारला – १७ लाख डोस मोफत आणि २० लाख डोस विकत
नेपाळ – ११ लाख मोफत आणि १० लाख डोस विकत
सौदी अरेबिया – ४५ लाख डोस विकत
अफगाणिस्तान – ९ लाख ६८ हजार डोस त्यापैकी ५ लाख डोस मोफत
श्रीलंका – १२ लाख ६४ हजार डोस