व्हॉट्सॲप क्षमतांचा गैरवापर करतेय : केंद्र सरकार
देश बातमी

व्हॉट्सॲप क्षमतांचा गैरवापर करतेय : केंद्र सरकार

नवी दिल्ली : व्हॉट्सॲपच्या प्रायव्हसी पॉलिसी मुद्यावरून केंद्र सरकार आणि व्हाट्सअप यांच्यात वाद सुरू आहे. दरम्यान व्हॉट्सॲपकडून आपल्या क्षमतांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप केंद्र सरकारने केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

व्हॉट्सॲप प्रायव्हसी पॉलिसी स्वीकार करण्यासाठी दबाव टाकत आहे. तर भारतीय स्पर्धा आयोगाच्या २४ मार्च रोजीच्या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. प्रायव्हसी पॉलिसी नोटिफिकेशन्स संदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाने व्हॉट्सॲपला हंगामी आदेश द्यावे. अशी मागणी केंद्र सरकारने केली.

व्हॉट्सॲप प्रायव्हसी पॉलिसीनुसार युजर्सचा व्हॉट्सॲपवरील कंटेंट व्हॉट्सॲप कुठेही वापरू शकेल. व्हॉट्सॲप युजर्सचा डेटा शेअर करू शकेल. फेसबुक आणि इंस्टाग्राम या प्लॅटफॉर्मला विशेषतः ही माहिती मिळेल. व्हॉट्सॲप प्रायव्हसी पॉलिसीमुळे युजर्सच्या गोपनीय माहितीवर लक्ष ठेवले जाईल. त्यानुसार युजर्सना जाहिराती पाठवल्या जातील. युजर्सच्या स्मार्टफोनचा आयपी ॲड्रेस ट्रॅक केला जाईल. युजर्सच्या सक्रियतेवर व्हॉट्सॲपचे लक्ष असेल.