बातमी महाराष्ट्र

मुंबईत बरसणार सरी; तर या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट

मुंबई : यंदा राज्यात मॉन्सूनचं आगमन अपेक्षेपेक्षा अधिक लवकर झालं आहे. त्यामुळे आनंदी वातावरण असून मुंबईमध्ये गेल्या आठ्वड्यापासून मुसळधार पाऊस येतोय. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचतंय. तसंच मॉन्सूननं संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि विदर्भातही पाऊस बरसत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुंबईजवळच्या सांताक्रूझ, विरार, पालघर डहाणू, बोरीवाली, कल्याण, पनवेल, अलिबाग, खंडाळा घाट या उपनगरांमध्ये विजेच्या कडकडाटासह सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील तीन ते चार तास माध्यम स्वरूपाचा पाऊस या भागात होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तसेच विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशीम, अमरावती आणि नागपूर या ठिकाणी पावसाळा सुरुवात झाली आहे. अजून काही तास विजेच्या कडकडाटासह पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इतर जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

या जिल्ह्यांना रेड अलर्ट
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट जरी कारण्यात आला आहे. या जिल्ह्यांच्या काही भागांमध्येही पुढील तीन ते चार तास विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस येण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *