पंतप्रधान मोदी कोरोनाविरोधी लढ्यात करत आहेत १८-१९ तास काम
देश बातमी

पंतप्रधान मोदी कोरोनाविरोधी लढ्यात करत आहेत १८-१९ तास काम

नवी दिल्ली : कोरोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये केंद्र सरकार दिवसरात्र काम करत असून पंतप्रधान नरेंद्र मोदीही दिवसातील १८-१९ तास काम करत असल्याचं मत केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

केंद्र सरकार कोरोनाविरुद्धच्या या लढ्यामध्ये कोणताही भेदभाव करत नसल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे. केंद्र कोणताही भेदभाव करत नसल्याने या विषयावरुन राजकारण केलं जाऊ नये, असंही गोयल यांनी म्हटल्याचं एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

मुलाखतीमध्ये गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगालच्या निवडणूक दौऱ्यावरुन परतल्यानंतरही दिवसातील १८ ते १९ तास काम करत असल्याचं म्हटलं आहे. निवडणूक प्रचार संपवून परतल्यानंतर मोदींनी देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्याचा दावाही गोयल यांनी केला आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी कोरोना परिस्थितीवरुन भाष्य करताना भेदभाव होत असल्याचे आरोप केल्याचा संदर्भ गोयल यांनी आपल्या मुलाखतीमध्ये दिला. या विषयाला राजकीय रंग दिला जात असल्याचं पाहून मला फार वाईट वाटलं, असं गोयल यांनी मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.

कोरोनाचा सर्वाधिक प्रदुर्भाव असणाऱ्या १२ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर केंद्राने ऑक्सिजनच्या पुरवठ्यासंदर्भातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे, असंही गोयल यांनी स्पष्ट केलं. सहा हजार १७७ मेट्रीक टन ऑक्सिजन हा कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असणाऱ्या राज्यांमध्ये पुरवला जाणार असून सर्वाधिक पुरवठा म्हणजे दीड हजार मेट्रीक टन ऑक्सिजन महाराष्ट्राला देण्यात येणार आहे, असंही गोयल यांनी म्हटलं आहे.