अवघ्या 6 सेकंदात ‘या’ तारखेला चांदणी चौकातील पूल होणार जमिनदोस्त; नियोजन अंतिम टप्प्यात
पुणे बातमी

अवघ्या 6 सेकंदात ‘या’ तारखेला चांदणी चौकातील पूल होणार जमिनदोस्त; नियोजन अंतिम टप्प्यात

पुणे, 27 सप्टेंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुण्यातील चांदणी चौक येथे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. या नंतर चांदणी चौक येथील पूल पाडण्याचे आदेश देण्यात आले आणि त्याची तयारी देखील सुरू झाली आहे. चांदणी चौकातील उड्डाणपूल पाडण्यासाठीचे नियोजन जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

1 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री 11 वाजेपासून 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजेच्या दरम्यान हा पूल पाडला जाईल, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिली. यासाठी शनिवारी रात्री 11 वाजता ट्रँफिक बंद केली जाणार आहे. यानंतर 2 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 2 वाजता ब्लास्टिंग केलं जाईल. 1300 होल पाडून 600 किलो एक्सप्लोजिव्ह वापरून हा पूल पाडला जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्यासह वाहतूक पोलीस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी चांदणी चौक पूल पाडण्याबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

ब्लास्टवेळी त्या परिसरात फक्त चार तंत्रज्ञ त्या सुरक्षित स्थळावर हजर असतील. ब्लास्टिंग नंतर रात्री अडीच वाजताच तिथलं डेब्रिज काढायला सुरू करण्यात येणार आहे. यानंतर सकाळी 8 वाजता त्या रस्त्यावरची वाहतूक पुन्हा सुरू केली जाईल. 200 मी परिसरातील लोक ब्लास्टिंगच्या आधी सुरक्षित ठिकाणी evocative केले जातील. Fragmanted explosive demolition पद्धतीने अवघ्या 6 सेकंदात चांदणी चौकातील पूल पाडला जाईल.