अखेर चीनने मान्य केलचं; गलवान व्हॅली संघर्षात पीएलएच्या अधिकाऱ्यांसह चार सैनिकांचा मृत्यू
देश बातमी

अखेर चीनने मान्य केलचं; गलवान व्हॅली संघर्षात पीएलएच्या अधिकाऱ्यांसह चार सैनिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : पूर्व लडाखमधील गलवान व्हॅलीत झालेल्या संघर्षात पीएलएच्या अधिकाऱ्यांसह चार सैनिक मारले गेले होते. या चार सैनिकांना चीननं मरणोत्तर पदक दैऊन गौरवल्यानं ही माहिती समोर आली आहे. १५ जून २०२० रोजी मध्यरात्री गलवान व्हॅलीत झालेल्या भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले होते. या घटनेत चिनी सैनिकही मरण पावल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, त्याबद्दल चीनने कधीही मान्य केले नाही.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अखेर पँगाँग सरोवर परिसरातून सैन्य मागे घेतल्यानंतर चीनने गलवान व्हॅलीतील संघर्षाबद्दल मौन सोडल असून, त्या घटनेत चिनी सैनिकही मारले गेल्याचं अधिकृतरित्या समोर आलं आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र असणाऱ्या ‘ग्लोबल टाइम्स’ने देखील गलवान व्हॅलीत पाच सैनिकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. कमांडर क्यूई फबाओ, चेन होंगुन, जियानगॉन्ग, जिओ सियुआन आणि वाँग जुओरन अशी या जवानांची नावं आहे. यातील चौघांचा मृत्यू गलवान व्हॅलीतील संघर्षात झाला होता. तर एकाचा मृत्यू मदत मोहिमेदरम्यान नदीत वाहून गेल्यानं झाला होता.

तसेच, ‘पीपल्स डेली’नं दिलेल्या माहितीनुसार चीनच्या केंद्रीय लष्करी आयोगाने काराकोरम पर्वतावर कर्तव्यावर असलेल्या आणि जूनमध्ये शहीद झालेल्या चार सैनिकांचा गौरव केला आहे. या चार सैनिकांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

दरम्यान, संपूर्ण देश कोरोना महामारीशी संघर्ष करत असतानाच पूर्व लडाखमधील गलवान व्हॅलीत भारत व चिनी सैन्यामध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले. त्यानंतर दोन्ही देशातील संबंध अद्यापही कमालीचे ताणले गेले आहेत. त्याचबरोबर गलवान व्हॅलीतील संघर्षानं भारत-चीन सीमेवर युद्धसदृश्य स्थितीही निर्माण झाली होती. या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्याचबरोबर चिनी लष्कराचेही सैनिक मारले गेल्याची माहिती समोर आली होती. मात्र चीनने आपले सैनिक मारले गेल्याची कधीच वाच्यता केली नाही.

तर गलवान व्हॅलीत चिनी लष्कराबरोबर झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. यात कर्नल संतोष बाबू यांनाही वीरमरण आलं होतं. संतोष बाबू यांचा मरणोत्तर महावीर चक्र पदकाने गौरव करण्यात आला आहे. त्याचबरोबर इतर पाच जवानांचा मरणोत्तर वीर चक्र देऊन सन्मान करण्यात आला आहे.