धक्कादायक ! मधाच्या नावाखाली पतंजली विकते साखरेचा पाक
देश बातमी

धक्कादायक ! मधाच्या नावाखाली पतंजली विकते साखरेचा पाक

नवी दिल्ली : मधाच्या नावाखाली रामदेव बाबांची पतंजली कंपनी साखरेचा पाक विकत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पतंजलीसह अनेक बड्या कंपन्या हे करत असल्याचे सेंटर फॉर सायन्स अँड एनवायरमेंटनं (CSE)ने केलेल्या तपासातून उघड झाले आहे. सर्वाधिक मध तयार करणाऱ्या कंपन्या मधामध्ये साखर मिसळत असल्याचं या तपासाद्वारे समोर आलं आहे.
सीएसईनं १३ छोट्या मोठ्या कंपन्यांच्या मधाचे नमूने तपासले. या कंपन्यांच्या मधात ७७ टक्क्यांपर्यंत भेसळ असल्याचं दिसून आलं. मधाच्या २२ मापदंडांपैकी काही कंपन्या केवळ ५ मापदंडांमध्ये खऱ्या उतरल्याचं माहिती देण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, कंपनीची प्रतीमा मलिन करण्याचा या चाचणीमागील प्रयत्न असल्याचं या कंपन्यांचं म्हणणं आहे. आम्ही भारतात नैसर्गिक रित्या मिळणारा मधच एकत्र करतो आणि त्याची विक्री करतो, असा दावाही या कंपन्यांकडून करण्यात आला आहे. यामध्ये फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटीच्या (FSSAI) नियमांचं योग्यरित्या पालन करण्यात आल्याचं कंपन्यांनी म्हटलं आहे. आमच्या कंपनीचा मध १०० टक्के शुद्ध आहे. तसंच जर्मनीमध्ये झालेल्या एमएमआर चाचणीतही तो यशस्वी ठरला होता. आम्ही ठरवण्यात आलेले २२ मापदंड पूर्ण करतो. नुकताच जो अहवाल समोर आला तो प्रायोजित असल्याचं वाटत आहे, असं डाबरच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलं आहे.

सीएसईनं केलेल्या कंपन्या कोणत्या?
1) पतंजली
2) डाबर
3) बैद्यनाथ
4) झंडू
5) हितकारी
6) एपिस हिमालयसा
यासह आणखी सात कंपन्यांचा मध शुद्धतेचं प्रमाण तपासणाऱ्या न्युक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्स (NMR) या चाचणीत अयशस्वी ठरले. परंतु डाबर आणि पतंजलीनं या चाचणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.