देश बातमी

सीएमआयई’चा धक्कादायक रिपोर्ट; दरमहा जात आहेत करोडो नोकऱ्या

नवी दिल्ली : ज्या काळात देशात फक्त रिया चक्रवर्तीविषयी चर्चा सुरु होती त्या काळात देशभरातील तब्बल २.१ कोटी लोकांनी आपला रोजगार गमवला आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग ऑफ इकॉनॉमी (सीएमआयई) ने प्रसिध्द केलेल्या एका अहवालातून ही बाब समोर आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सीएमआयई’ने प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार, एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान नियमित पगारावर काम करणाऱ्या २.१ कोटी लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. त्यामध्ये औद्योगिक कामगारांपासून ते पांढर्‍या कॉलरच्या नोकरदारांचाही समावेश आहे. तर ऑगस्टमध्ये पगाराच्या नोकऱ्यांची संख्या ८.६ कोटीवरून ६.५ वर आली. तर यापूर्वी एप्रिल ते जुलै दरम्यान १.८९ कोटी लोकांनी त्यांच्या नोकर्‍या गमावल्याची नोंद करण्यात आली आहे.

जो अहवाल सरकारने आधीच द्यायला पाहिजे होता तो अहवाल सीएमआयई देत आहे. ज्या सत्ताधारी केंद्र सरकारने दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे वचन दिले होते त्या सरकारच्या काळात इतक्या लोकांनी आपली नोकऱ्या गमवल्या आहेत, याबाबत सरकारनेच जनतेला ही माहिती देणे गरजेचे होते. तथापि, सीएमआयईची आकडेवारी पाहिल्यास दरमहा करोडो लोकांनी आपले रोजगार गमावल्याचे दिसत आहेत. त्यामुळे सरकारने जाहीर केलेल्या नोकऱ्यांच्या पॅकेजचा कोणताही फायदा झालेला दिसत नाही, हेच या अहवालातून दिसून येते.

दरम्यान,अर्थशास्त्रज्ञ रघुराम राजन म्हणतात की, सरकारी उपाययोजना आणि सध्याची आकडेवारी पाहता सरकार आणि नोकरशहांना याची भीती वाटली पाहिजे. त्यामुळे अर्थव्यवस्थेचे हे आव्हान केवळ कोरोना महामारीमुळे झालेल्या या नुकसानीची भरपाई करणे इतकेच नसून गेल्या तीन -चार वर्षात उद्भवलेल्या आर्थिक समस्यां सोडविण्याचे आवाहनही आपल्यासमोर असणार आहे. तर कोरोनाची परिस्थिती ज्या प्रकारे बिकट होत चालली आहे, हे पाहता कोरोनाच्या नियंत्रणापर्यंत येईपर्यंत अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळून जाईल, असे दिसत आहे.

(सदर लेख पत्रकार कृष्णकांत यांच्या फेसबुक पेजवरून घेण्यात आला आहे)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत