काँग्रेसचे नेते माजी केंद्रिय गृहमंत्री सरदार बुटा सिंह यांचे निधन
देश बातमी

काँग्रेसचे नेते माजी केंद्रिय गृहमंत्री सरदार बुटा सिंह यांचे निधन

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सरदार बुटा सिंह यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 86 वर्षाचे होते. बुटा सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री, कृषी मंत्री, रेल्वे मंत्री, क्रीडा मंत्री आदी पदे भूषवितानाच बिहारचे राज्यपाल आणि राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्षपदही सांभाळले होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ते 8 वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. बुटासिंह हे माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक होते. बुटा सिंह यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही शोक व्यक्त केला आहे. काँग्रेस पक्षाचे दिग्गज दलित नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सरदार बूटा सिंह यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते बर्‍याच दिवसांपासून आजारी होते. सुमारे तीन महिन्यांपूर्वीच त्यांना एम्समध्ये दाखल केले होते. बुटा सिंग हे चार वेळा जलोरमधून खासदार राहिले आहेत. राज्यभरातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.

पंजाबमधील जालंधर येथे जन्मलेल्या बूटा सिंह यांनी काँग्रेस सरकारच्या काळात अनेक मोठी पदे भूषविली. बुटा सिंह यांनी 70-80 च्या दशकात काँग्रेस पक्षाला पुन्हा मार्गावर आणण्यासाठी कठोर परिश्रम घेतले होते.