घरगुती गॅसच्या किंमतीत पुन्हा वाढ; सर्वसामान्यांना फटका
देश बातमी

घरगुती गॅसच्या किंमतीत पुन्हा वाढ; सर्वसामान्यांना फटका

नवी दिल्ली : घरगुती गॅसच्या किंमतीत पुन्हा वाढ करण्यात आली असून याचा सर्वसामान्यांना जोरदार फटका बसला आहे. विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या वाढीनंतर दिल्लीमध्ये घरगुती वापरासाठी १४.२ किलो एलपीजी सिलेंडरची किंमत ८५९.५ रुपयांवर गेली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ही वाढ सोमवारी रात्रीपासूनच लागू झाली आहे. १४.२ किलो एलपीजी सिलेंडरची कोलकातामध्ये ८८६ रुपये, मुंबईत ८५९.५ रुपये आणि लखनऊमध्ये ८९७.५ रुपये झाली आहे. त्याचप्रमाणे १९ किलो व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीतही ६८ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत त्यांची किंमत वाढून १६१८ रुपये झाली आहे.

२०२१ च्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीत दिल्लीत एलपीजी सिलेंडरची किंमत ६९४ रुपये होती. एका वर्षात एलपीजी सिलेंडरच्या किमतीत १६५.५० रुपयांची वाढ झाली आहे. तर डिसेंबरपासून आतापर्यंत सिलिंडरच्या किमतीत सुमारे २७५ रुपयांनी वाढ झाली आहे. तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या १ आणि १५ तारखेला एलपीजीच्या किंमतीचा आढावा घेतात. यापूर्वी १ जुलै रोजी तेल कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत २५ रुपयांनी वाढ केली होती. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या सतत वाढत असलेल्या किंमतींमुळे केंद्र सरकारवर बरीच टीका होत आहे. पण हे सर्व आंतरराष्ट्रीय किंमतींवर अवलंबून आहे आणि सरकारच्या हातात काही नाही, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.