लस आल्यास सर्वात आधी कोणाला देणार? आरोग्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

लस आल्यास सर्वात आधी कोणाला देणार? आरोग्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून प्रत्येकाला एकच प्रश्न आहे की कोरोनावरील लस कधी येणार? पण, कोरोनावरील लस आली तरी ती लगेच प्रत्येकाला मिळणार नाही त्याचा प्रधान्यक्रम ठरवण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोरोना लस डॉक्टर, पोलीस आणि ज्येष्ठांना प्रथम देणार असल्याचे टोपे यांनी म्हटले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सरकारच्या प्रोटोकॉलनुसारच लसीकरण होणार आहे. कोरोना व्हॅक्सिन लवकर येण्याबाबत आशा आहे. त्यासाठी प्रयत्न सुरु असून डॉक्टर्स, ज्येष्ठ नागरिक, पोलिसांना सर्वात आधी व्हॅक्सिन देण्यात येईल आणि तसे नियोजन सध्या सुरु असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. आरोग्यमंत्री टोपे यांनी जालन्यातील मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या समन्वयातून आणि केंद्र सरकारच्या प्रोटोकॉल नुसारच कोरोना व्हॅक्सिन देण्यात येईल, असेही टोपे म्हणाले. राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून सर्वात आधी व्हॅक्सिन देण्यासंदर्भात कोणतीही मागणी नाही, असेही टोपे म्हणाले. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार सतीष चव्हाण पदवीधर मतदारसंघात हॅट्रिक साधणार, असा विश्वास आरोग्यमंत्री टोपे यांनी व्यक्त केला.