मृत्यू रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचे; पहिला डोस ८२ तर दुसरा डोस ९५ टक्के प्रभावी
कोरोना इम्पॅक्ट बातमी

मृत्यू रोखण्यासाठी लसीकरण महत्वाचे; पहिला डोस ८२ तर दुसरा डोस ९५ टक्के प्रभावी

नवी दिल्ली : इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च-नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ एपिडिमोलॉजीच्या नव्या विश्लेषणानुसार कोविड १९ लसीचा एक डोस मृत्यूपासून बचाव करण्यासाठी प्रभावी असल्याचे समोर आले आहे. पहिला डोस घेतल्यानंतर ही शक्यता ८२ टक्के तर दुसऱ्या डोस नंतर ९५ टक्के असल्याचे या विश्लेषणात म्हटले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तामिळनाडूमधील अति जोखमीच्या गटांमधील मृत्यू रोखण्यासाठी कोविड -१९ लसीच्या प्रभावाचा हा अभ्यास २१ जून रोजी इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये प्रकाशित करण्यात आला. तामिळनाडू पोलीस विभागाने कर्मचार्‍यांच्या लसीकरणाची माहिती त्यामध्ये देण्यात आली. यामध्ये एकही डोस न घेतलेले,पहिला डोस आणि दुसरा डोस घेतलेल्यांच्या माहितीची विभागणी केली होती. तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान लस घेतलेल्या नागरिकांची तसेच मृत्यू झालेल्या आणि रुग्णालयात असणाऱ्यांची माहिती यामध्ये देण्यात आली आहे.

लस घेतलेल्या आणि लसीकरण न झालेल्या पोलीस कर्मचार्‍यांमधील कोविड -१९ने मृत्यूच्या घटनांचा अंदाज लावण्यासाठी या आकडेवारीचा उपयोग केला गेला असे आयसीएमआर-एनआयईचे संचालक डॉ. मनोज मुर्हेकर यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले आहे.