देशात ४३ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात ४३ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत देशात ४३ हजार २६३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता उपचाराधीन कोरोना रुग्णांची संख्या ३ लाख ९३ हजार ६१४ झाली आहे. आत्तापर्यंत देशातल्या ०३ कोटी ३१ लाख ३९ हजार ९८१ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशात गेल्या २४ तासांत ४० हजार ५६७ रुग्ण करोनामुक्त झाले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता तीन कोटी २३ लाख ४ हजरा ६१८ वर पोहोचली आहे. काल दिवसभरात देशात ३३८ मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे मृतांचा आकडा आता चार लाख ४१ हजार ७४९ वर पोहोचला आहे.

तर गेल्या २४ तासांत ८६ हजार ५१ लाख ७०१ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस घेतली. त्यामुळे देशातल्या लस घेतलेल्या एकूण नागरिकांची संख्या ७१ कोटी ६५ लाख ९७ हजार ४२८ झाली आहे.