नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत समाजकल्याण विभागात झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आयुक्तांकडून आदेश
पुणे बातमी

नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत समाजकल्याण विभागात झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आयुक्तांकडून आदेश

पुणे : मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहासाठी समाजकल्याण विभागाने सीसीटीव्ही आणि त्यासंबंधित उपकरणांची खरेदी चढ्या दराने केली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता ती खरेदी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. टीव्हीचे मॉडेल क्रमांक आणि स्पेसिफिकेशनच्या दराची तपासणी ऑनलाइन पोर्टलवर केल्यानंतर चढ्या दराने खरेदी झाल्याचे त्यातून समोर आले आहे. यावर समाजकल्याण विभागाचे आयुक्त प्रशांत नरनवरे यांनी खरेदीमध्ये गैरप्रकार झाला असेल तर त्याची चौकशी करण्यात येईल. नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत खरेदी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून केली जात असल्याचे सांगितले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे वसतिगृह व निवासी शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी व इतर सोयी सुविधांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत तीन टक्के निधी समाजकल्याण विभागाला उपलब्ध करून दिला होता. त्या निधीतून 16 सीसीटीव्ही कॅमेरेसंच खरेदी करण्यात आले. ती खरेदी सर्व नियम धाब्यावर बसवून चढ्या दराने केल्याचे समोर आले आहे खरेदी केलेल्या व करण्यासारख्या वस्तूंची बाजारातील किंमत विचारात घेतली तर जवळपास 50 ते 55 लाख रुपयांची फेरफार झाल्याचे प्राथमिक दृष्ट्या समोर आले आहे. याबाबत सकाळने वृत्त दिले आहे.

सातारा येथील एका ठेकेदार कंपनीकडून खरेदी करताना अटी नियमांना मुरड घालत ठेकेदार कंपनीचे हित जपले आहे. तसेच नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या इतर वस्तूंच्या खरेदीसाठी मोठी फेरफार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली येत आहे. सीसीटीव्ही खरेदीच्या व्यवहाराबाबत समाज कल्याण आयुक्त विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.