सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या आईलाच घातला अडीच कोटींचा गंडा
बातमी विदर्भ

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या आईलाच घातला अडीच कोटींचा गंडा

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांच्या घरीच अडीच कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. सरन्यायधीश शरद बोबडे यांच्या परिवाराची अडीच कोटी रुपयांना फसवणूक केली असून या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. शरद बोबडे यांच्या आई मुक्ता बोबडे या बऱ्याच वृद्ध आणि आजारी असल्याचा फायदा घेत आरोपीने फसवणूक केल्याचे तपासात उघड झाले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बोबडे कुटुंबीयांची शहरातील आकाशवाणी चौकात वडिलोपार्जित स्थावर संपत्तीवर सीझन लॉन उभारण्यात आले आहे. या लॉनची मालकी ही मुक्ता बोबडे यांच्या नावावर आले. हा लॉन चालवण्यासाठी तापस घोष याला दिला होता. गेल्या 10 वर्षांपासून तापस घोष आणि त्यांची पत्नी हा लॉन चालवत होते. पण घोष याने लॉनच्या भाडेपोटी मिळणाऱ्या रक्कमेमध्ये बनावट पावत्या तयार करून हिशेबामध्ये हेराफेरी केली.

खोटी बिलं व पावती बनवून घोष याने मुक्ता बोबडे यांची फसवणूक केली आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. हे प्रकरण संवेदनशील असल्याने फसवणूक केल्या प्रकरणी सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोबडे कुटुंबीयांनी तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी तापस घोष याला पोलिसांनी अटक केली असल्याचे पोलीस उपायुक्त विनिता साहू यांनी सांगितले.