कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! राज्यातील बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाणात वाढ; नव्या रुग्णांची संख्याही वाढली

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत होत असताना दोन दिवसांत नव्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. मागच्या २४ तासात ५१ हजार ४५७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याचे दिलासादायक चित्र असले तरी ३४ हजार ३१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्याचबरोबर राज्यात कोरोनामुळे एका दिवसात ५९४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा १.५४ टक्के इतका आहे. राज्यात ३० लाख ५९ हजार ९५ रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. तर २३ हजार ८२८ रुग्ण संस्थात्मक विलगीकरण कक्षात आहेत. आजपर्यंत राज्यात ३ कोटी १८ लाख ७४ हजार ३६४ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ५४ लाख ६७ हजार ५३७ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्या राज्यात ४ लाख १ हजार ६९५ सक्रीय कोरोना रुग्ण आहेत.

दरम्यान, मुंबईत गेल्या २४ तासात १३५० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४,५६५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यानं त्यांन घरी सोडण्यात आलं आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९३ टक्के आहे. सध्या मुंबईत २९ हजार ६४३ सक्रीय रुग्ण आहेत. रुग्ण दुप्पटीचा दर २६९ दिवसांवर पोहोचला आहे. १२ मे ते १८ मे दरम्यात रुग्णवाढीचा दर हा ०.२५ टक्के इतका होता. मुंबई आणि पुण्यात नव्या रुग्णांचा वेग मंदावल्याने दिलासादायक चित्र दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *